Posts

Showing posts from April, 2020

भारतीय आणि भारतीय...

भारतात भारतीय भेटतात का? अस कधीतरी वाचलेलं। प्रश्न चुकीचा की बरोबर विचार करू नका... उत्तर सोपी आहे भारतात भारतीय भेटतात. ओळखायचा कसा हाच खरा प्रश्न आहे। तस ते खूप जास्त अवघड नाही। घालून दिलेली शिस्त अजिबात पाळत नाही असं आढळत असल तर समजावं पठ्ठा भारतीय दिसतोय(तो इटालियन पण असू शकतो बरका). असो गमतीचा विषय बाजूला सोडुयात। विषय आहे कोरोनाच्या संसर्गाचा। बघून आश्चर्य वाटतंय की लोकांना ते जगावे म्हणून झोडाव लागतंय। हे कदाचित केवळ आपल्याकडेच होत असावे। आता लगेच देशांची यादी देऊ नका। मी केवळ सुसंस्कृत देशाबद्दल(???) बोलतोय। देश सुसंस्कृत असला तरी नागरिक सुसंस्कृत असतात का हा मात्र विषय तेवढा अभ्यासाचा। संचार बंदी कशी असते हे बघायला जाणारा आपला देश गर्दी मुळे पसरतो अश्या आजारात मन लावून काम करत आहेत अश्या डॉक्टर्स, पोलीस, सफाई कामगार यांच्या कौतुकासाठी गर्दी करतो... रोज मार खाऊ पण बहोत कष्टाने अन बलिदानाने मिळालेलं स्वतंत्र गमावणार नाही अश्या अविर्भावात आम्ही पोलिसांचा मार खाऊन देखील पुन्हा रस्त्याने फिरतो। देवाजवळ काय एक दिवस जायचंच आहे म्हणून आज कोरोनाच्या संसर्गाने गेलोतर काय होत म्हणून धार्...